बंदच्या भूमिकेवर अजूनही कांदा उत्पादक ठाम !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २३ सप्टेंबर २०२३ | नाशिक जिल्ह्यातील येवला येथे कर्नाटकमध्ये उत्पादित होणाऱ्या कांद्यावर कोणत्याही प्रकारचे निर्यात शुल्क आकारले जाणार नाही, असा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे, त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनानेही निर्यात शुल्क हटवावे, अशी मागणी येवला येथे शुक्रवारी कांदा व्यापाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आली.

याचबरोबर आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या बंदच्या भूमिकेवर ठाम राहत २६ सप्टेंबर रोजी पणन मंत्र्यांसमवेतच्या बैठकीत तोडगा न निघाल्यास बंद बेमुदत कायम ठेवण्याचाही इशारा देण्यात आला. येवला- अंदरसुल कांदा व्यापारी असोसिएशनने कांदा लिलाव बंद बाबत येवल्यात बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कांदा व्यापारी असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष खंडू देवरे होते. बैठकीत नाशिक, अहमदनगर, धुळे व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथून शेकडो व्यापारी सहभागी झाले होते. यावेळी सरकारविरोधी धोरणांबाबत रोष व्यक्त करण्यात आला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम