माजी राज्यपाल कोश्यारी राजभवनात दाखल ; हालचालींना आला वेग !
दै. बातमीदार । १६ मे २०२३ । राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राज्यात पदावर असतांना अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत येत होते. त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे विरोधक चांगेलेच आक्रमक झाले. त्यांनी कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. शेवटी कोश्यारी यांनीच राजीनाम्याची इच्छा व्यक्त करत, आपला राजीनामा दिला होता.
राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आता पुन्हा एकदा राजभवनात दिसणार आहेत. ते 6 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. कोश्यारी यांचं नुकतंच डेहराडूनवरून मुंबईत आगमन झालं आहे. 16 ते 21 मे दरम्यान कोश्यारी यांचा राजभवनात मुक्काम असणार आहे. ते 17 मे ते 20 मे दरम्यान नियोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. मिळत असलेल्या माहितीप्रमाणे कोश्यारी राज्यातील काही डॉक्टरांना देखील भेटणार आहेत. कोश्यारी यांचा हा महाराष्ट्र दौरा चांगलाच चर्चेत आला आहे.
सुप्रीम कोर्टाकडून ताशेरे दरम्यान गेल्या आठवड्यात राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल लागला. या निकालावेळी सुप्रीम कोर्टाकडून तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर ताशेरे ओढण्यात आले आहेत. राज्यापालांनी सत्तास्थापनेसाठी दिलेलं निमंत्रण हे घटनाबाह्य असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं. तसेच शिंदे गटाकडून भरत गोगावले यांची प्रतोत म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ही नियुक्ती देखील घटाबाह्य असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं. निकालानंतर पहिला महाराष्ट्र दौरा सत्तासंघर्षाच्या निकालानंतर प्रथमच भगसिंह कोश्यारी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. ते सहा दिवस राजभवनात मुक्कामी असणार आहेत. या काळात ते आपल्या नियोजित कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार असून, काही डॉक्टरांना देखील भेटणार असल्याची माहिती समोर येत आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम