विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जालना येथे घेतली आढावा बैठक

बातमी शेअर करा...

 

 

औरंगाबाद, जालना दि ७ सप्टेबंर | अतिवृष्टीबाबत संबंधित अविकाऱ्यांसोबत चर्चा करत नुकसानीची माहीती घेतली. तसेच मोसंबीवर बुरशी आल्याने सरसगट पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. यावर्षी चांगला पाऊस आहे पण महावितरणच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांना नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर सामना करावा लागते. महावितरणच्या अधिकाऱ्यांना अतिरीक्त विद्युत संच(DP) ठेवण्याचे आदेश दिले.

 

जालन्यातील मुख्य रस्ता असलेला मुर्ती वेस रस्ता बंद केल्याने नागरीकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. ताबडतोब रस्याचे काम सुरु करत येणाऱ्या तीन महीन्यात ते पुर्ण करण्याच्या सुचना केल्या. तसेच जालना ते खामगाव रस्याचे काम कन्हैयानगर येथे वनविभागाने थांबविल्याने येथील नागरीकांना त्रास होता, त्वरीत अडथडे दुर करत काम सुरु करण्याचे आदेश दिले.

 

यावेळी जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड, शिवसेना उपनेते लक्ष्मणराव वडले, शिवसेना सहसंपर्कप्रमुख शिवाजीराव चोथे, सहसंपर्क़प्रमुख डॉ हिकमतराव उढान, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, जिल्हाप्रमुख ए जे बोराडे, मा.आमदार संतोष सांबरे, जिल्हा परिषद अध्यक्ष उत्तमराव वानखेडे, उपजिल्हाप्रमुख रमेश गव्हाड, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, न. प मुख्याधिकारी संतोष खांडेकर, जिल्हाकृषी अधीक्षक रणदिवे, महावितरण अधीक्षक अभियंता अ पि पठाण, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, तालुकाप्रमुख जयप्रकाश चव्हाण, नंदु दाभाडे, उपजिल्हाप्रमुख अशोक शिंदे,नगरसेवक चेतन कांबळे आदी या बैठकीला उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम