नव्या संसद भवन उद्घाटनाला विरोधी पक्षांचा बहिष्कार ; शहा म्हणाले…
दै. बातमीदार । २४ मे २०२३ । देशात होत असलेल्या नवीन संसद भवन इमारतीच्या उद्घाटनावरून सध्या राज्यात विरोधीपक्ष आक्रमक झाले आहेत. या कार्यक्रमावर देशातीव १९ विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. यादरम्या नया उद्घाटन सोहळ्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमीत शाह यांनी माहिती दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करतील. यावेळी पंतप्रधान मोदी हे संसद भवन उभारण्यास हातभार लावणाऱ्या ६० हजार कामगारांचा देखील सन्मान करतील.
अमित शाह यांनी सांगितलं की संसद भवन लोकार्पण सोहळ्यात एका ऐतिहासिक घटनेची पुनरावृत्ती, सोबतच एका परंपरेला पुनरुज्जीवन देखील मिळत आहे. अमित शाह म्हणाले की, नवीन संसदेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने ऐतिहासिक परंपरा पुन्हा जिवंत केली जाईल. यामागे युगानुयुगे जोडलेली परंपरा आहे. याला तमिळमध्ये सांगोल असेही म्हणतात आणि याचा अर्थ संपत्तीने संपन्न. स्वतंत्र्याच्या अमृतमोहत्सवात प्रधानमंत्र्यांनी जे काही लक्ष ठरवले होते, त्यापैकी एक ऐतिहासिक परंपराचा सन्मान आणि पुर्नजागरण हे देखील होतं असे अमित शाह म्हणाले.
भारताला स्वंतत्र्य मिळालं तेव्हा ही परंपरा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वीकारली असल्याचं सांगत अमित शहा यांनी यामागील किस्सा देखील यावेळी सांगितला. अमित शाह म्हणाले की, १४ ऑगस्ट १९४७ च्या रात्री एक मोठी घटना घडली. ज्याबद्दल देशातील अनेकांना माहिती नाही. सेंगोलने आपल्या इतिहासात खूप महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. सेंगोल हे इंग्रजांकडून भारतीयांकडे झालेल्या सत्ता हस्तांतरणाचे प्रतिक बनले होते. या घटनेच्या ऐतिहासिक महत्वानंतर तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल की हे इतके दिवस आपल्यासमोर का आले नाही. पंतप्रधान मोदी यांनी या गौरवशाली परंपरेला लोकांसमोर आणण्यासाठी लोकार्पण दिवस निवडला असल्याचे शहा म्हणाले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम