ओरियन सीबीएसईच्या विद्यार्थ्यांचे लक्षवेधी ठरले पथसंचलन

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | ८ एप्रिल २०२४ | जळगाव येथील नारायण रेकी सत्संग परिवार यांच्या वतीने “आनंदी राहण्याचा मंत्र’ या विषयावर सत्संग परिवाराच्या प्रमुख राजेश्वरी दीदी यांचे व्याख्यान छत्रपती श्री.संभाजीराजे नाट्यगृहात झाले. याप्रसंगी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या स्काऊट गाइड ग्रुपच्या वतीने शिस्तबद्धरीत्या पथसंचलन करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. हे शिस्तबध्द पथसंचलन लक्षवेधी ठरले.

क्रीडाशिक्षक योगेश महाजन यांनी विद्यार्थ्यांकडून शिस्तबध्द सराव करून घेतला. प्राचार्य सुषमा कंची यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल दीदींनी विद्यार्थ्यांना रोख रक्कम व बक्षीस देऊन आशीर्वाद दिले. संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात देखील या स्वरूपाची कामगिरी पार पाडण्यासाठी आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम