पाकिस्तानने गमाविले अव्वल स्थान ; हिंदुस्थान दुसऱया क्रमांकावर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ९ मे २०२३ ।  सलग चार सामन्यांत न्यूझीलंडला हरवून एकदिवसीय क्रिकेटच्या जागतिक क्रमवारीत अव्वल आलेल्या पाकिस्तानची एका पराभवाने तिसऱया स्थानावर घसरण झाली आहे. या पराभवानंतर ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर पोहोचलाय तर हिंदुस्थान दुसऱया क्रमांकावर आहे.

सध्या न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानच्या दौऱयावर असून त्यांना पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिले चार सामने गमवावे लागले होते. ते पाहुण्यांचा 5-0 ने धुव्वा उडवतील, अशी अपेक्षा होती. पण न्यूझीलंडने पाचवा सामना जिंकून आपली लाज राखली, मात्र पाकिस्तानला आपले अव्वल स्थान 48 तासांतच मोकळे करावे लागले आणि दोन दिवसांपूर्वी पहिला क्रमांक गमावणारा ऑस्ट्रेलिया पुन्हा अव्वलस्थानी विराजमान झाला. पाकिस्तानला ज्या पराभवामुळे आपले स्थान गमवावे लागले त्या सामन्यात न्यूझीलंडने 299 धावा केल्या होत्या तर पाकिस्तानचा संघ 252 धावांतच आटोपला. 47 धावांचा पराभव त्यांच्या गंडांतरासाठी कारणीभूत ठरला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम