गोपीनाथ गडावरून पंकजा मुंडेची गर्जना ; वाईट बोलण्याचे समर्थन नाही !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १२ डिसेंबर २०२२ ।  राज्यातील भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज १५ डिसेंबर जयंती असून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर त्यांचे दर्शन घेतले. तसेच अर्धा तास त्यांनी मौन बाळगत गोपीनाथ मुंडे यांची जयंती वेगळ्या पद्धतीनं साजरी केली. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधानाच्या मुद्यावर आपलं मत व्यक्त केले. तर महापुरुषांबद्दल वाईट बोलण्याचे समर्थन करणार नाही, असे त्यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले.

यावेळी बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्यात की, महापुरुषांच्या बद्दल बोलण्याचा अधिकार आहे. पण त्यांच्याबद्दल वाईट बोलण्याचा अधिकार नाही. त्या काळात त्यांनी कसा संघर्ष पेलला हे पाहण्यासाठी आपण होतो का? असं पंकज मुंडे म्हणाल्यात. तर आज कोणी महापुरुषांबद्दल काही बोलले तर त्याला आपण समर्थन करणार नाही, पण त्याच बोलण्याचीच जणू आपण वाट पाहत आहोत अशा प्रकारचे राजकारण घडत असेल तर ते अंतर्मुख करणारे असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्यात.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम