पानसरे हत्या प्रकरण : २१ मार्चला होणार सुनावणी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १४ मार्च २०२३ । राज्यातील ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्ये प्रकरणी संशयित आरोपी न्यायालयात हजर नसल्याने सुनावणीत आज साक्षीपुरावे होऊ शकले नाहीत. जिल्हा व सत्र न्यायाधीश (वर्ग ३) एस. एस. तांबे यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. पुढील सुनावणी २१ मार्चला ठेवण्यात आली आहे.

दरम्यान, चारही साक्षीदार आज न्यायालयात हजर होते. मात्र, संशयित आरोपींपैकी काहींची सुनावणी ही कर्नाटकातील गौरी लंकेश खून खटल्यात होती. त्यामुळे ते हजर राहू शकत नसल्याचे संशयित आरोपींचे वकील समीर पटवर्धन यांनी न्यायालयात सांगितले. त्यामुळे ही सुनावणी पुढील तारखेस निश्‍चित करण्यात आली. या वेळी विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर आणि शिवाजीराव राणे उपस्थित होते.

ॲड. निंबाळकर यांनी समन्स बजावलेले चारही साक्षीदार आज न्यायालयात हजर असल्याचे सांगितले. साक्षीपुरावा सुरू करावा, अशीही विनंती न्यायालयाला केली. मात्र, ॲड. पटवर्धन यांनी आक्षेप घेत सर्व आरोपी न्यायालयात हजर असतानाच साक्षीपुरावे व्हावेत, अशी मागणी केली. तसेच, संशयित आरोपींपैकी काही जण आज गौरी लंकेश हत्या सुनावणीत असल्याचे सांगितले.
तसेच, संशयित आरोपी अमित बदी आणि गणेश मिस्किन यांना मराठी येत नसल्याने कन्नड आणि मराठी येणारा दुभाषक आवश्यक असल्याची मागणी ॲड.पटवर्धन यांनी न्यायालयात केली. यावर ॲड. निंबाळकर यांनी सर्व आरोपींनी वकीलपत्रावर सह्या केल्या आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम