पालकांनी खासगी शाळांच्या मक्तेदारीला बळी पडू नका ; शिक्षणमंत्र्यांचे आवाहन !
दै. बातमीदार । २६ मे २०२३ । राज्यातील अनेक पालकांना सरकारी शाळेविषयी नेहमीच आकस असतो त्यामुळे अनेकांना खासगी शाळांतील प्रत्येक उपक्रमात आर्थिकदृष्ट्या सहभागी होणे शक्य नाही. अशावेळी मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. खासगी शाळांमध्ये शिकविले जाणारे सर्व विषय सरकारी शाळांमध्ये शिकवले जातात. केवळ इंग्रजीच्या हव्यासापोटी पालकांनी खासगी शाळांच्या मक्तेदारीला बळी पडू नका, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे सांगितले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील एका कार्यक्रमानंतर केसरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तसेच नर्सरी शाळांना सरकारी परवानगी आणि नियमणासाठी कडक निर्बंध लादू, असेही ते म्हणाले. नव्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांसाठी तीन दिवस आधीचा गणवेश आणि तीन दिवस आताचा नवा गणवेश असेल. तसेच, विद्यार्थ्यांमध्ये श्रमाची प्रतिष्ठा रुजवायला हवी. व्यक्तीमत्त्व विकास आणि कौशल्याधारीत प्रशिक्षणासाठी प्राथमिक शाळांमध्ये “स्काऊट गाइड’ अनिवार्य असेल. यापुढचे शिक्षण हे मराठीतूनच असणार आहे. पालकांनीही आता इंग्रजी माध्यमाचा हव्यास सोडायला हवा. खासगी प्राथमिक शिक्षणाला जेवढी शिस्त लावता येईल, तेवढा प्रयत्न आम्ही करतोय. त्यांनी सांगितले. प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र वह्या शाळेत आणण्याची आवश्यकता असू नये. सोबतच विद्यार्थ्यांना शाळेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केल्यास त्यांच्या दप्तराचे ओझे कमी होईल, असेही केसरकर यांनी सांगितले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम