
पारोळा भडगाव रस्त्याच्या कामामुळे शेतकऱ्यांचे नुकसान – शेतकरी नेते सुनील देवरे
पारोळा (प्रतिनिधी)
पारोळ्यापासून भडगाव पर्यंत रस्त्याचे कॉन्क्रिटी करणचे नवीन काम सुरू असून या कामामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूनां शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होत आहे त्यात प्रामुख्याने रस्त्याच्या आजूबाजूतील पाणी जाण्यासाठी गटारी बंद केल्यामुळे पावसाचे पाणी शेतामध्ये तुंबत आहे त्यामुळे कापूस पिकाचे व शेडनेट मधील भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे तसेच रस्त्याचे विस्तारीकरण करत असताना शेतकऱ्यांच्या आपले क्षेत्र रस्त्यात जात असल्याचे शासनाकडून किंवा मक्तेदाराकडून कोणतीही नोटीस न देता शेतकऱ्यांची विनापरवानगी शेतकऱ्याच्या शेतामध्ये रस्ता वाढवीत असल्याचे जाणवते त्यामुळे शेतकऱ्यांची शेती ही रस्त्यामध्ये जात असल्याने शेतकऱ्यांना त्याचा कोणताही मोबदला भेटताना दिसून येत नाही व शेतामध्ये पाणी तुडुंब भरल्यामुळे शेती पिकाचे झालेले नुकसान भरपाई मिळताना दिसून येत नाही त्याकरिता महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमाने शेतकऱ्यांच्या हिताकरिता आंदोलन छेडण्यात येणार असून यासंदर्भात शेतकऱ्यांच्या समस्या व झालेले नुकसान प्रत्यक्ष पाहणी करिता महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष व शेतकरी नेते सुनील देवरे यांनी चोरवड शिवारात भेट दिली असता आपले मत व्यक्त केले.
यावेळी तहसीलदार डॉ उल्हास देवरे यांच्या सोबत फोनवर या संदर्भात चर्चा केली असता दोन ते तीन दिवसात निर्णय घेण्यात यावा अशी विनंती सुनील देवरे यांनी केली. यावेळी संघटनेचे तालुका कार्याध्यक्ष गुलाब पाटील,मृद व जलसंधारण समितीचे तालुका अध्यक्ष एस झेड पाटील , पारोळा शहर युवा कार्याध्यक्ष निलेश महाजन तसेच चोरवड गावातील रवींद्र साहेबराव पाटील,जगदीश साहेबराव पाटील,मोहन वसंत कुंभार,राकेश प्रकाश देसले, चंद्रकांत बापूराव पाटील,योगेश जगन पाटील,योगेश कमलाकर देसले,कैलास राजाराम महाजन, विलास सुधाकर देसले,बाळू बारकू जगताप, लोकेश जगदीश पाटील,सुरेश चिंतामण पाटील,लोटन शामराव पाटील यांच्या सह शेतकरी उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम