पारोळा बस स्थानकातील दुकानाला आग लाखो रुपयांचे नुकसान
पारोळा ता.5
पारोळा बस स्थानकातील कालिंका जनरल स्टोअर्स या दुकानाला ता .चार रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली त्यात लाखो रुपयाचे वस्तू जळून खाक झाल्या वेळेत घटना कळल्याने मोठा अनर्थ टळला
पारोळा येथील बस स्थानकात ठक्कर बाझार कॉम्प्लेक्स मध्ये ता. चार रोजी साडेदहा वाजेच्या सुमारास परिसरात असलेले प्रमोद भावसार यांच्या मालकीचे कालिंका जनरल स्टोअर्स या दुकानात काहीतरी शॉट सर्किट झाल्याने दुकानात असलेल्या पंखा व फ्रिज अचानक जळाले त्यामुळे दुकान आग लागली व धुराचा लोंडा बाहेर येऊ लागला ही घटना येथील सुरक्षा रक्षक नाना पाटील व बस स्थानक परिसरात फिरणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आली त्यांनी लगेच दुकान मालकांशी संपर्क साधला त्याच क्षणाला दुकानांमधील फ्रिजचे कॉम्प्रेसर फुटून आग वाढू लागली होती दुकान उघडून उपस्थित अमोल भावसार, दीपक भावसार, प्रा संजय भावसार प्रवीण जगताप, निंबा मराठे, बारी भाऊ, महेंद्र दानेज, अमोल महाजन, मोहित शिंदे, नानू मराठे, तुषार भावसार, राहुल महाजन, सोनू पाटील, महेश महाजन आदी जनसमुदायाने आग आटोक्यात आणली व काही क्षणातच नगरपालिकेचे अग्निशामक दलाची गाडी ही दाखल झाली यावरील चालक मनोज पाटील व सहकाऱ्यांनी यांनी संपूर्ण आग विझवली व अर्धा तासाच्या आत आग आटोक्यात आल्याने आजूबाजूला कुठलेही नुकसान झाले नाही मात्र कालिंका जनरल मधील सर्व वस्तू फर्निचर फ्रिज आदी साहित्य जळून खाक झाले सुमारे दीड ते दोन लाखाच्या जवळपास नुकसान झाल्याचे समजते मात्र याबाबत शहर तलाठी निशिकांत माने व आदींनी घटनास्थळी येऊन पहाणी केली
बस स्थानकात अग्नी सुरक्षेसाठी कुठलीही सुविधा नाही
पारोळा बस स्थानकात जवळपास तीस ते चाळीस दुकाने आहेत रोज रात्री आठ ते दहा बसेस मुक्कामाला असतात त्यामुळे बस स्थानकाच्या सुरक्षेसाठी अग्निरोधक सिलेंडर, किंवा आग विहिरीत साहित्य कुठेही बसवण्यात आलेले नाही त्यामुळे दुकानाला लागलेली आग आज थोडक्यात बचावली यापुढे असा काय अर्थ झाल्यास त्याला जबाबदार कोण, त्यामुळे बस स्थानकात लवकरात लवकर अग्नि रोधक साहित्य बसवावे अशी मागणी होत आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम