पारोळा नगरपरिषदेचा १७६ कोटी ४२ लक्ष रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर

बातमी शेअर करा...

पारोळा नगरपालिकेचा सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ०५ लक्ष शिलकीचे, तसेच २० कोटी २७ लक्ष १९ हजार रुपये महसुली खर्चाचे व १५६ कोटी १० लक्ष ५६ हजार रुपये भांडवली खर्चाचे असे एकूण १७६ कोटी ४२ लक्ष मात्र रुपयाचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. एकमताने या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली.

पारोळा नगरपालिकेच्या सभागृहात मुख्याधिकारी यांनी अर्थसंकल्पाबाबत माहिती सादर केली. लेखापाल दिपक महाजन यांनी अंदाजपत्रकाचे वाचन केले. सभागृहात कार्यालयीन अधीक्षक यामिनी जटे, सभा लिपिक किशोर चौधरी, अंतर्गत लेखापरीक्षक सार्थक मोरास्कर तसेच सर्व विभाग प्रमुख तथा लिपिक उपस्थित होते.

पालिकेस महसुली जमेतून, विविध करातून ५ कोटी ६२ लक्ष रुपये, महसुली अनुदाने ११ कोटी ६८ लक्ष रुपये, मालमत्ता भाडे ४ लक्ष रुपये, विविध फी आकार १७ लक्ष ४३ हजार रुपये, विक्री व भाडे आकार ५ लक्ष ९९ हजार रुपये, ठेवी व व्याज ०५ लक्ष रुपये, इतर किरकोळ उत्पन्न ०३ लक्ष ७० हजार रूपये असे महसुली उत्पन्न येणे अपेक्षित आहे.

अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांची कामे व इतर विकास कामाची तरतूद केली आहे. सदर अंदाजपत्रकात कोणत्याही प्रकारचा कर वाढीचा बोजा नागरिकांवर न टाकत्ता उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न साधण्यात आला आहे. नगरपरिषदेमार्फत पाणी पुरवठा, भुयारी गटार योजना आणि इतर महत्त्वाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यामुळे शहराच्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम आणि नागरिकांसाठी सोयीस्कर होतील.
तसेच पारोळा नगरपरिषद क्षेत्रातील सर्व मान्यवर पत्रकार, प्रसार माध्यमे यांनी केलेल्या सहकार्याबद्दल देखील विशेष आभार व्यक्त केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम