
नागपुरात पार्थ पवार दाखल ; चर्चांना उधाण !
दै. बातमीदार । २१ डिसेंबर २०२२ । राज्यातील आज तिसऱ्या दिवसाच्या अधिवेशन सुरु आहे. शिंदे सरकारकडून विविध घोषणा या वेळी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार नागपुरात दाखल झाल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.
नागपुरात पार्थ पवार पोहोचले आहेत, हे कळताच माध्यमांनी त्यांना घेराव घातला. त्यावेळी त्यांनी काही काळ माध्यमांशी संवाद साधला आहे. पार्थ पवार म्हणाले, “मला यावर काहीही भाष्य करायचं नाही. मी माझ्या वेगळ्या कामासाठी आलो आहे. मी अधिवेशनासाठी आलो नाही. ” पार्थ पवार पुढे म्हणाले, “मला काही मंत्री लोकांना भेटायचं होतं, दादांना भेटायचं होतं, त्यासाठी आलो होतो. आमचे काही वैयक्तिक विषय आहे. त्याविषयी मी आलो आहे. अजून दोन चार दिवस मी इथेच आहे. कोणाला भेटणार एवढं नाही सांगू शकत. “

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम