
दै. बातमीदार । २ जानेवारी २०२३ तुम्ही आतापर्यत अनेक शौकि पाहिले असतील पण असे शौकी खूप कमी प्रमाणात पाहिले असतील तुम्ही चहाप्रेमी आहात का? तुमच्यापैकी अनेकजण चहाप्रेमी असतील किंवा तुमचे मित्रसुद्धा असतील. एखाद्याला जसं दारूचं व्यसन असतं तसं अनेकांना चहाचं व्यसन असतं. चहासाठी ते काहीही करू शकतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका बसचा ड्रायव्हर चहा पिण्यासाठी बस रोडवर सोडून गेल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
men😭☕ pic.twitter.com/EDOSmxlnZC
— Shubh (@kadaipaneeeer) January 2, 2023
सदर व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून तो रस्त्याच्या मध्ये बस थांबवून चहा पिण्यासाठी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आलेला आहे. तर बसच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणावर ट्राफीक जाम झालं आहे. मागचे वाहने हॉर्न वाजवताना या व्हिडिओत दिसत आहेत. तर बसचा ड्रायव्हर चहाचा कप घेऊन परत गाडीमध्ये चढत आहे.
दरम्यान, चहा घेऊन गेल्यावर बस ड्रायव्हर गाडी चालू करून पुढे निघून जात आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तो चहाप्रेमी आहे, तो काहीही करू शकतो अशा प्रतिक्रिया अनेक नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम