रोटरी जळगांव सेंट्रल क्लबतर्फे पर्यावरणावर पाटील यांचे व्याख्यान

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | ५ एप्रिल २०२४ | जळगाव रोटरीतर्फे जगभरात एप्रिल हा पर्यावरण महिना साजरा करण्यात येतो. या निमित्त रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलतर्फे रोटरी हॉल गणपती नगर येथे निसर्ग मित्र समितीचे जिल्हाध्यक्ष पर्यावरण शिक्षक प्रविण पाटील यांचे पर्यावरण आणि आपली जबाबदारी या विषयावर व्याख्यान आयोजीत करण्यात आले होते. या प्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष कल्पेश शाह, मानद सचिव दिनेश थोरात यांची व्यासपीठावर उपस्थित होती.

 

प्रविण पाटील यांनी पर्यावरण समतोल राखण्यासाठी सर्वानी जबाबदारी घेऊन वृक्षारोपण वृक्ष संवर्धन करुन प्रत्येकाने पाण्याचा जपुन वापर करुन पाणी जमिनीत जिरवणे किती गरजेचे असुन प्लॉस्टीकचा वापर कमीत कमी करावा. प्रत्येक सण साजरे करतांना पर्यावरणपुरक सण साजरे करावे एक गाव एक होळी, फटाकेमुक्त दिवाळी , नैसर्गिक कलर वापरुन धुलीवंदन साजरे करावे, शाडुंमातीच्या मुर्ती यांचे महत्व व प्लॉस्टर ऑफ पॅरिसचे तोटे , ध्वनी प्रदुषण , वाहनांचा कमीत कमी वापर करावा तसेच कचरा न जाळता घंटा गाडीतच दयावा या बाबत सखोल अशी माहिती दिली.

सुत्रसंचलन राजेश चौधरी यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. अपर्णा भट-कासार यांनी केले. यावेळी रोटरीचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम