कॉंग्रेसमधील वादानंतर पटोलेंनी दिली मोठी माहिती !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १५ फेब्रुवारी २०२३ । राज्यातील कॉंग्रेस पक्षामध्ये अंतर्गत वाद काही दिवसापूर्वीच उफाळून आला होता. त्यावर आता नाना पटोले यांनी मोठी भूमिका घेतली आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासूनच काँग्रेसमधील अंतर्गत गोंधळ चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली होती. त्यातच निवडणुकीतील अपक्ष विजयानंतर सत्यजीत तांबे यांनी अनेक गौप्यस्फोट केले. तसेच राज्यातील काँग्रेस नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यातच थोरात यांनी आपल्या विधानसभेतील गटनेतेपदाचा राजीनामा दिला.

त्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. त्याचबरोबर आता बाळासाहेब थोरात यांनी दिलेल्या गटनेते पदाच्या राजीनाम्याबाबत नाना पटोले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. थोरात यांनी राजीनामा दिलं ना पत्र दिलं असं पटोले यांनी म्हंटलं आहे. त्याचबरोबर बसून हा वाद सोडवू असं म्हणत बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबे यांच्याशी समेटीची तयारी नाना पटोले यांनी दाखवली आहे. एका चर्चेमधून वाद सोडवू अशी भूमिका पटोले यांनी मांडली आहे. त्यामुळे काँग्रेसमधील या दुफळीवर मार्ग निघणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
बाळासाहेब थोरात यांनी दिलेल्या पत्राची कॉपी मला दाखवा. असं कुठलही पत्र किंवा राजीनामा दिला नाही मला त्या दोन्ही पैकी कोणतीही कॉपी दाखवा. कोणत्याही वृत्तपत्राने किंवा चॅनेलने ते पत्र दाखवलेल नाही असं नाना पटोले यांनी म्हंटलं आहे. या सर्व गोष्टीमुळे असं दिसून येत आहे की, त्यांनी पत्र दिलं नाही. राजीनामा दिला नाही. त्यांच पत्र आणि राजीनामा बोलण्यापूरतच आहे. हा वाद आता मिटला आहे. माध्यम हा वाद वाढवत आहेत. आमची चर्चा सुरू आहे असंही नाना पटोले यांनी म्हंटलं आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम