अमळनेरात 6 जानेवारीला पत्रकार दिन सोहळा..

बातमी शेअर करा...

अमळनेर-(प्रतिनीधी )येथील अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने 6 जानेवारी रोजी आद्यपत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जयंतीनिमित्त पत्रकार दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर सोहळा अमळनेर शहरातील नियोजित पत्रकार भवनाच्या जागी सकाळी 10 वाजता पार पडणार आहे.यावेळी प्रमुख उपस्थिती आजी माजी आमदार तसेच सर्व लोकप्रतिनिधी,शासकीय अधिकारी, कर्मचारी, तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.तरी शहर आणि तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी यावेळी आवर्जून उपस्थिती द्यावे असे विनम्र आवाहन पत्रकार संघटनेचे अध्यक्ष चेतन राजपूत आणि सचिव चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम