वृध्दाश्रमातील आश्रयदात्यांचा आई महोत्सवानिमित्त सत्कार

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार I ५ डिसेंबर २०२२ I तालुक्यातील कानळदा येथील महर्षी कण्व आश्रम येथे आहे डॉ. उल्हास पाटील होमिवोपॅथी महाविद्यालयातर्फे बुधवार दि.७ डिसेंबर २०२२ रोजी होणाऱ्या आई महोत्सवाच्यानिमित्ताने येथील वृध्दाश्रमातील आश्रयदात्यांचा सत्कार गोदावरी समूहाचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हासदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

वृध्दाश्रमातील आश्रयदात्यांचा सत्कार कार्यक्रमाच्या सुरुवातीला गोदावरी फाउंडेशन कडून आश्रमाचे महंत स्वामी अव्दैतानंद चंद्रकिरणजी सरस्वती, ट्रस्टी रमेश सपकाळे, बापू चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.यानंतर आई महोत्सवाच्या निमित्ताने डॉ. उल्हासदादा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी होमिओपॅथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. बी. पाटील, आयुर्वेदिक महाविद्यालयाचे डिन डॉ. हर्षल बोरोले, डॉ. चोपडे, डॉ. पंकज शर्मा, प्रियंका वाघ, डॉ. डांगरे, जयमाला राणे, ललित महाजन, कमलेश, संकेत पाटील, कीर्ती पाटील, पूर्वा, मानसी,अंकिता, भावेश, वसंत, विठ्ठल,प्रणव, विनोद आणि हंसराज चव्हाण यांच्या सोबतच गावकऱ्यांची उपस्थिती होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम