विठ्ठलाच्या पूजेचे मार्ग मोकळा : पहाटे होणार महापूजा

बातमी शेअर करा...

बातमीदार | २२ नोव्हेबर २०२३

राज्यात कार्तिकी यात्रेला मोठे महत्व दिले जात असते, त्यामुळे हि पूजा पंढरपूर येथील विठ्ठल- रुक्मिणीच्या मंदिरात केली जात असून याठिकाणी राज्यातील अनेक भाविक भक्त दर्शनासाठी देखील येत असता, या पूजेला पहिला मान हा राज्याच्या सरकारमधील मंत्र्यांना असतो पण याच पूजेचा वाद गेल्या काही दिवसापासून सुरु होता त्यावर आता मार्ग मोकळा झाला आहे.

यंदा कार्तिकी यात्रेची विठ्ठल- रुक्मिणीची शासकीय महापूजा गुरुवारी पहाटे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.  या पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मंदिरातील सुरक्षेची पाहणी आज सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक गिरीश देशपांडे यांनी केली.

कार्तिकी एकादशी निमित्ताने पंढरपुरातील विठ्ठल रुख्मिणी मंदिरात शासकीय महापूजा होणार आहे. या पूजेला विरोध करण्यात आला होता. मात्र मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर मराठा क्रांती मोर्चाने आपले आंदोलन मागे घेतले आहे. यामुळे शासकीय महापूजेचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु धनगर व कोळी समाजाच्या आंदोलनाबाबत अद्याप काही अपडेट नाही. या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. मराठा आणि धनगर समाज आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षतेविषयी पोलिसांनी विशेष काळजी घेतली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम