सत्ताधारी ६० आमदारांबाबत पवारांनी केला मोठा खुलासा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २ जानेवारी २०२३ राज्यातील हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी व विरोधक असा सामना रंगताना राज्यातील जनतेने पाहिला. अशातच सत्ताधारी पक्षाच्या ६० आमदारांचा दरमहा खर्च हा १२ कोटी असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत याबाबत आपली भूमिका मांडली आहे. राज्यातील 60 आमदारांच्या सुरक्षेवर वर्षाला 144 कोटी रुपये खर्च केले जात असल्याचं रोहित पवार यांनी म्हंटलं आहे.

 

अधिवेशनाच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर रोहित पवार यांनी सत्ताधारी आमदारांच्या खर्चाचा आढावा ट्वीटद्वारे मांडला आहे. याचा एक व्हिडिओ त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.

आमदार रोहित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा विधानसभेतील भाषणाचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओत धनंजय मुंडे सत्ताधारी आमदारांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत. तर “सत्ता पक्षातील जवळजवळ 60 आमदारांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा लागत असेल तर या राज्यात खरंच कायदा व सुव्यवस्था चांगली आहे का?”, असा प्रश्न धनंजय मुंडे सभागृहात उपस्थित केला होता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम