निवडणूक जवळ आली कि पवार असे विधान करतात ; देवेद्र फडणवीस !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १८ जून २०२३ ।  देशातील सर्वच राजकीय पक्षांनी लोकसभेची जोरदार तयारी सुरु केली असून विरोधक व सत्ताधारीमध्ये आतापासून आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. त्यातच भाजपने मिशन २०२४ ची तयारी सुरू केली असून देशभरातील लोकसभा मतदारसंघात आढावा आणि प्रचाराला सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यासाठी, बडे नेते मतदारसंघात उतर आहेत. तर, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनीही काही दिवसांपूर्वी पुण्यात येऊन कार्यकर्त्यांना मिशन लोकसभेचा मंत्र दिला. सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही प्रचार दौऱ्यावर असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच, नांदेड दौऱ्यावर असताना त्यांनी भाजपचे महाराष्ट्रातील मिशन सांगितले. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावरही टीका केली.

देशामध्ये विविध राज्यांचे चित्र बदलतेय. सत्ताधारी पक्षाला मतदार जागा दाखवत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजप लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेतील, असं वाटत नाही, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. शरद पवारांनी थेट मोदींची आणि भाजपची लाट ओसरल्याचा उल्लेखच येथे केलाय. त्यावरुन, आता देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना लक्ष्य केलंय. निवडणुका जवळ आल्या की शरद पवार अशी विधान करतात. यापूर्वी २०१४ च्या निवडणुकांवेळी, २०१९ च्या निवडणुकांवेळीही त्यांनी अशीच विधाने केली आहे. तुम्ही इंटरनेटवर जाऊन रेकॉर्ड पाहा, असे आवाहनच फडणवीस यांनी उपस्थितांना केले. फडणवीस यांची नांदेड येथील जाहीर सभेत बोलतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या सभेतून त्यांनी पवारांवर पलटवार केला.

निवडणुका आल्या की हे सांगतात मोदींची लाट नाहीये, आता सगळे विरोधात गेले आहेत. आता, आम्ही सगळे निवडून येणार आहोत, तुम्हाला आठवत असेल २०१९ पूर्वीही विरोधक सगळे एकत्र आले होते. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या स्टेजवर जेवढे नेते होते, तेवढ्या जागा देशातसुद्धा यांच्या आल्या नाहीत. आता, आमची उत्तर प्रदेश आणि गुजरातसोबत स्पर्धा आहे. मोदींना सर्वाधिक जागा कोण देतोय, याची ही स्पर्धा आहे. आम्ही २०१४ मध्ये ४२ जागा दिल्या, २०१९ मध्ये ४१ जागा दिल्या. आता, २०२४ मध्ये आम्ही पुन्हा ४२ पेक्षा जास्त जागा देऊ, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. तसेच, मोदींवर जनतेचं प्रेम आहे, त्यामुळे सगळा समाज आपल्या पाठिशी आहे, असेही त्यांनी म्हटले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम