पवारांनी खेळला पावरगेम ; शिंदे गटाच्या आमदाराने दादांना डीवचले !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ५ मे २०२३ ।  राज्यात गेल्या महिन्याभरापासून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार नॉटरिचेबलपासून चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यानंतर राज्यातील प्रत्येक व्यक्ती अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या प्रत्येक भूमिकेकडे लक्ष ठेवून असतांना शरद पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर देशभर चर्चा झाली. मात्र कार्यकर्ते आणि नेते या निर्णयाचा विरोध करत असल्याने शरद पवार यांनी अध्यक्ष निवड समिती नेमली होती. समिती जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल, असेही त्यांनी म्हटले होते. त्यानंतर बऱ्याच घडामोडी घडल्या असून अध्यक्ष निवड समितीने शरद पवार यांचा राजीनामा फेटाळला आहे. त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष म्हणून शरद पवार यांनीच राहावे असा ठराव केला आहे. याच संपूर्ण घडामोडीवर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांनी प्रतिक्रिया देत अजित पवार यांना डिवचले आहे.

आमदार संजय शिरसाठ म्हणाले, शरद पवार यांचा हा पावर गेम आहे. राष्ट्रवादीत अंतर्गत कलह होता, त्यामुळे शरद पवार यांनी हा मास्टरस्ट्रोक खेळला आहे. आता राष्ट्रवादीला नाविलाजास्तव एकत्र यावेच लागणार आहे. शरद पवार यांनी हे स्पष्ट केले आहे की, माझी ताकत म्हणजे माझी ताकत आहे. शरद पवार काहीही उलथापालथ करू शकतात हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.

मी जर निर्णय घेतला तर कुणालाही अडचण होऊ शकते हे शरद पवार यांनी सिद्ध करून दाखवले आहे. अजित पवार यांच्या चलबिचलपनाला आता ब्रेक बसला आहे. आता शांत बसणे हा एकमेव पर्याय अजित पवारांसमोर आहे. राष्ट्रवादीतील चलबिचल आता शांत होईल. अजित पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याच्या मनस्थितीत नाहीत, त्यांना महाराष्ट्राची धुरा स्वतःकडे घ्यायची आहे. अजित पवार जेव्हा बोलत होते, तेव्हा शरद पवार यांनी त्यांना थांबवले नाही. शरद पवार यांचा आमच्यावर काहीही परिणाम होणार नाहीत पण शरद पवार यांचा काँग्रेस आणि शिवसेनेवर परिणाम होणार आहे, या प्रकरणामुळे काँग्रेस आणि शिवसेनेला सेट बॅक बसला आहे. यामुळे आता शिवसेना भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना रंगेल.

वज्रमूठ सभा रद्द होण्याला शरद पवार हे प्रकरण कारणीभूत आहे. महाविकास आघाडीच्या सभेला मोठे नेते येणार नाहीत, त्यामुळे झाकली मूठ सव्वा लाखाची यावरून सभा रद्द झाल्याचा टोलाही आमदार संजय शिरसाठ यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. याशिवाय संजय शिरसाठ यांनी अजित पवार यांनाही डिवचले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम