पवारांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १५ जुलै २०२३ ।  राष्ट्रवादीला जोरदार धक्का देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या सत्तेत सहभागी झालेले अजित पवार यांना नुकतेच खाते वाटप देखील झाले असून त्यानंतर त्यांनी लागलीच नाशिक येथे दौरा करीत आपले शक्तीप्रदर्शन केले आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांचे देखील कौतुक केले आहे. त्यांचा सारखा नेता भारतात दुसरा नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. आगामी काळात होणाऱ्या एनडीएच्या बैठक आपण सहभागी राहणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले.

भारतीय जनता पक्षासोबत असलेल्या समविचारी पक्षांची बैठक दिल्लीत होणार आहे. या बैठकीला मी आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. या बैठकीदरम्यान आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याचा प्रयत्न करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. राज्यात अजून पुरेसा पाऊस नाही, ही चिंतेची बाब आहे. काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट आले आहे. या संदर्भात सविस्तर आढावा घेतला आहे. पदभार स्विकारल्यानंतर मी अर्थ आणि इतर विभागांचाही आढावा घेतला असल्याची माहिती पवार यांनी या वेळी दिली.

मला प्रशासनाचा अनुभव आहे. तरी देखील प्रत्येक मानुस काहीतर शिकण्याचा प्रयत्न करतो. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी सर्वसामान्यासाठी काम करण्याचा प्रयत्न करत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. सरकार म्हणून जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम