पवारांनी अजित पवारांचा प्रस्ताव फेटाळला ; भाजपसोबत कदापि नाहीच !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १७ जुलै २०२३ ।  राज्यातील राजकारणात मोठी खळबळ गेल्या काही दिवसापासून सुरु होती. तर रविवारी अजित पवारांनी थेट शरद पवारांची भेट घेतल्याने मुख्यमंत्र्यासह अनेकांना मोठा धक्का बसला होता पण आज पुन्हा एकदा शरद पवारांनी अजित पवारांचा प्रस्ताव फेटाळल्याने अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार गटाने काल वाय. बी. चव्हाण सेंटर येथे शरद पवारांची भेट घेऊन त्यांच्यासमोर समेटाचा प्रस्ताव ठेवल्यानंतर तो प्रस्ताव शरद पवारांनी धुडकावून लावला. यावेळी हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे. पुरोगामी भूमिका घेऊनच आपल्याला पुढे जायचे आहे. भाजपसोबत मला कदापि जायचे नसून आपल्याला संघर्ष करायचा आहे, असे शरद पवार म्हणाल्याची माहिती आहे.

शरद पवार हे आज नियमित कामकाजासाठी रविवारी मंत्रालयाजवळील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा, खासदार सुप्रिया सुळेही त्यांच्यासोबत होत्या. काही वेळानंतर अजित पवार आणि त्यांच्या गटातील नेत्यांचा ताफा अचानकपणे तिथे पोहोचला. अजित पवार यांच्यासह खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, मंत्री धनंजय मुंडे, छगन भुजबळ आदी मंडळी होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काका शरद पवारांच्या पाया पडून त्यांची माफी मागून महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा कलाटणी देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते.

शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला. प्रफुल्ल पटेल म्हणाले, राष्ट्रवादी पक्ष एकसंध कसा राहील यासाठी शरद पवारांनी मार्गदर्शन करावे आणि एकत्र काम करूया अशी विनंतीही शरद पवारांना केली. वार यांनी त्यावर काय प्रतिक्रिया दिली असे माध्यमांनी विचारले असता, शरद पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, असे पटेल यांनी सांगितले. अजित पवार व अन्य नेते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमधून गेल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी तातडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पवार आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांना फोन करून बोलवून घेतले. दोघेही महाविकास आघाडीची बैठक सोडून चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पोहोचले. शरद पवार, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील यांची नंतर बैठक झाली. त्या बैठकीनंतर जयंत पाटील यांनीही माध्यमांशी संवाद साधला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम