पुण्यात मनसेच्या मोरेंना पवारांची ऑफर !
दै. बातमीदार । ५ डिसेंबर २०२२ । गेल्या दोन ते तीन वर्षापासून सातत्याने पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे मनसेवर नाराज असल्याची चर्चा राज्यभर होत होती ते आज पक्ष सोडतील तेव्हा सोडतील असे विरोधकांना वाटत होते पण तसे काही हि आतापर्यत झालेले नाही, तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीत येण्याची थेट ऑफर दिली आहे. अजितदादांच्या ऑफरनंतर आता राजकीय वर्तुळातील अनेक नेत्यांच्या भूवया उंचावल्याचे दिसुन आले आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील फायरब्रँड नेते आणि राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक वसंत मोरे यांनी पक्षाच्या शहर कोअर कमिटीच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. वसंत मोरे नाराज असल्याच्या चर्चा अनेक वेळा समोर येतात. तर काही दिवसांपूर्वी मनसे माथाडी कामगार सेना जिल्हाध्यक्ष निलेश माझिरेंची हाकालपट्टी करण्यात आली. त्यानंतरही मोरे नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. तर वसंत मोरे मनसे सोडणार की काय?, अशी चर्चा सुरू होती. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीत येण्याची थेट ऑफर दिली आहे. अजितदादांच्या ऑफरनंतर आता राजकीय वर्तुळातील अनेक नेत्यांच्या भूवया उंचावल्याचे दिसुन आले आहेत.
एका विवाह सोहळ्यामध्ये वसंत मोरे आणि अजित पवार या दोघांनीही हजेरी लावली होती. त्याचवेळी अजित पवार- वसंत मोरे यांची भेट झाली आहे. भेटीवेळी अजित पवारांनी थेट वसंत मोरे यांना राष्ट्रवादीत येण्यासाठीची ऑफर दिली आहे. अजित पवार तात्या कधी येता… वाट पाहतोय, असं म्हणाले आहेत. अजित पवारांच्या वक्तव्याला वसंत मोरे यांनीही दुजोरा दिला आहे. आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर वसंत मोरेंना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिल्यामुळे मनसेमध्ये खळबळ वाढु शकते. वसंच मोरे पुण्यातील मनसेचा चेहरा आहेत. त्यामुळे वसंत मोरे काय भुमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागुन असणार आहे.
तर यासंदर्भात बोलताना मनसे सोडणार नसल्याचे देखील वसंत मोरे यांनी सांगितले आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यासंदर्भात भूमिका घेतली होती. राज ठाकरे यांनी घेतलेली भुमिका वसंत मोरे यांना रुचली नाही. त्यानंतर मोरे यांनी ठाकरे यांची भेट घेतली आणि आपलं मत बोलून दाखवलं. त्यानंतर राज ठाकरे यांनी साईनाथ बाबर यांची शहराध्यक्षपदी नियुक्त केलं होतं. त्यानंतर वसंत मोरे नाराज असल्याची चर्चांना उधाण आलं होतं.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम