पवारांच्या विधानाने शिंदे गटात अस्वस्थता !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २२ ऑगस्ट २०२३

राज्यातील एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात अजित पवारांनी प्रवेश केल्याने शिंदे गटाच्या अनेक आमदारांच्या ते जिव्हारी लागले असल्यावर देखील त्यांनी आम्ही सोबत असल्याचे दावा केला होता व नुकतेच ठाण्यातील रुग्णालयात झालेल्या मृत्यूप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्र्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे थेट विचारणा केल्याने शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. आता याच मुद्यावरुन शिंदे गटात अस्वस्थता पसरल्याची माहिती आहे. अजितदादांना वेळीच आवरावे, अशी मागणी शिंदे यांचे निकटवर्तीय भाजपच्या नेत्यांकडे करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

‘तुमच्या ठाण्यात एवढे मृत्यू कसे’ असा थेट सवाल अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना केला. त्यावर शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. हा वाद आणखी वाढू नये म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मूळ विषयाला बगल दिली आहे. त्यामुळे या विषयावर शिंदे आणि पवार यांच्यात पुढे संवाद झाला नाही. अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून शिवसेनेच्या शिंदे गटात अस्वस्थता नारीजीचे सुर आहेत. शिंदे गटाच्या आमदारांनी राष्ट्रवादीला सरकारमध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. कृषीसह काही महत्त्वाची खाती शिंदे गटाला गमवावी लागल्याने मंत्र्यांमध्ये प्रतिकूल प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच ट्वीट करून कष्टाळू आणि गतीशील मुख्यमंत्री अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांची प्रशंसा केली होती. मोदी यांनी मुख्यमंत्र्यांची प्रशंसा केली असताना ठाण्यातील घटनेचे निमित्त करून राजकीय कुरघोडी करण्याच्या अजित पवार यांच्या प्रयत्नांबद्दलही शिंदे गटात नाराजी आहे. अजित पवार यांचा मुख्यमंत्रीपदावर डोळा आहे. राष्ट्रवादीत बंड केल्यापासून ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून होणारा त्यांचा उल्लेखही शिंदे गटाच्या आमदारांना खुपतो. शिंदे गटाच्या काही नेत्यांनी फडणवीस यांच्याकडे वस्तुस्थिती काय आहे, अशी विचारणा केली होती. त्यानंतर शिंदे हेच मुख्यमंत्रीपदी कायम राहतील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम