कार्यकर्त्यांच्या ‘त्या’ घोषणेनंतर पवारांच्या पत्नी चिडल्या !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २ मे २०२३ ।  देशाचे राष्ट्रवादीचे कॉंग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांचे आत्मचरित्र असलेल्या लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मुंबईत पार पडत आहे. या प्रकाशन सोहळ्यामध्ये भाषण करताना राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली आहे.

त्यानंतर सभागृहात कार्यकर्त्यांनी गोंधळ सुरू केला. पवार यांनी हा निर्णय मागे घ्यावा यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी त्यांना विनंती देखील केली. यावर बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि इतर मोठे नेते भावुक झाले. यावेळी काही नेत्यांना कार्यकर्त्यांना अश्रु अनावर झाले होते.
शरद पवार यांनी घेतलेला हा निर्णय मागे घ्यावा यासाठी सभागृहात मोठा गोंधळ सुरू झाला. त्यानंतर त्यांना विनंती केल्यानंतरही त्यांनी निर्णय मागे न घेतल्यामुळे पुन्हा आवाज सुरू झाले. त्यानंतर गर्दीतून एक आवाज आला ‘साहेब मोदीला जर हाकलायचं असेल तर तुमच्याशिवाय पर्याय नाही’ या आवाजानंतर शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार चिडल्याचे दिसून आलं. तर शरद पवार यांनी हात वर करत त्यांना थांबवलं.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम