जनता अडचणीत : होमलोन महागणार ; आरबीआयने रेपो रेटमध्ये केली वाढ !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ८ फेब्रुवारी २०२३ । देशातील गेल्या आठ दिवसापूर्वीच अर्थसंकल्प झालेला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं आपलं पतधोरण जाहीर केलं असून त्यानुसार रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आली आहे. हा रेपो रेट ०.२५ बेसिस पॉईंटनं वाढवण्यात आला आहे. त्यामुळं होमलोन महागणार आहेत. यामुळं बेरोजगारी आणि महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्यांच्या अडचणीत आणखीच वाढ झाली आहे.

गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी रेपो रेटमध्ये ०.२५ बेसिस पॉईंटनं वाढ केली आहे, त्यामुळं तो आता ६.५ टक्क्यांवर पोहोचला आहे. रेपो रेटमध्ये सलग सहाव्यांदा वाढ करण्यात आली आहे. रेपो रेटबाबत महत्वाच्या घोषणाही होण्याची शक्यता आहे. यापूर्वी तीन दिवस आरबीआयच्या एमपीसीची महत्वाची बैठक पार पडली. यानंतर बैठकीत काय चर्चा झाली तसेच यावेळी काय निर्णय घेतले गेले याची माहिती गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

रिझर्व्ह बँकेनं रेपो रेटमध्ये वाढ केल्यानं होमलोनच्या ईएमआयमध्ये वाढ होणार आहे. मे २०२२ मध्ये जेव्हा ४ टक्के रेपो रेट होता त्यात आता वाढ होऊन ६.५ टक्क्यांवर पोहोचला आहे. यावर गव्हर्नर म्हणाले, गेल्या तीन वर्षात जागतीक अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामानुसार जगभरातील मध्यवर्ती बँकांना व्याजदार वाढ करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. महागाईवर नियंत्रणासाठी हे कठीण निर्णय घेणं क्रमपात्र आहे.

गव्हर्नर दास म्हणाले, जागतीक मंदीची स्थिती आता तितकी गंभीर दिसत नाहीए जितकी काही महिन्यांपूर्वी होती. जगतील प्रमुख अर्थव्यवस्थांच्या विकासाच्या शक्यतांमध्ये सुधारणा झाली आहे. त्यामुळं चलनवाढीत घट झाली आहे. त्याचबरोबर या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीत महागाईचा दर ५.६ टक्के राहण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम