जनतेचं लक्ष वेगळ्या विषयाकडे वळवायचे, उर्फीने भाजप नेत्या वाघांवर केली टीका

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १ जानेवारी २०२३नेहमीच सोशल मिडीयावर जरा हटके असणारी उर्फी जावेद हि मात्र भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी तिच्यावर टीका केल्यानंतर जरा आक्रमक दिसून आली. ती कपड्यांवर वेगवेगळे प्रयोग करत असते आणि त्यामूळे ट्रोलच्या निशाण्यावर येते. आत्तापर्यंत लोकांनी उर्फी जावेदला पोत्यापासून ब्लेड, लोखंडी साखळी, इलेक्ट्रिक वायर ते मोबाइल सिमपर्यंत बनवलेल्या ड्रेसमध्ये पाहिले आहे. यामूळं तिला अनेक लोकांनी तिच्यावर टिका केली आहे. मात्र उर्फीनेही सर्वांना जोरदार प्रत्यूत्तर दिलयं.

नुकतचं भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदचा एक व्हिडीओ शेअर करत ट्वीट करत म्हणाले की, “श्शीSSS…अरे हे काय चाललंय मुंबईत? रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी उत्तानपणे नंगटपणा करणारी ही बाई हिला रोखायला मुंबई पोलिसांकडे IPC/CRPC आहेत की नाही? तात्काळ बेड्या ठोका हिला. एकीकडे निष्पाप महिला, मुली विकृतांच्या शिकार होतायत तर ही बया अजून विकृती पसरवतीये.”
त्यानंतर उर्फीने तिची नवीन स्टाईल दाखवली. इतकच नाही तर तिने भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्या ट्वीटला उत्तर दिला. उर्फी ट्वीट करत म्हणाली की, ‘आज राजकारण्यांना पाहून वाईट वाटते. लोकांच्या नजरेत येण्यासाठी मला लक्ष्य करत आहे. अत्याचारासाठी माझ्या कपड्यांना दोष देणं, सोयीचं आहे. नेहमीच पीडितेच्या कपड्यांना दोष दिला जातो अनेक मूद्दे आहेत. जसं बेरोजगारी, लाखो प्रलंबित अत्यचाराची प्रकरणं, खून. या प्रकरणांचे काय?’

दुसऱ्या रिप्लायमध्ये उर्फी म्हणतेय, ‘तुमच्यासारखे राजकारणी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा बाजूला ठेवतात. तुम्हाला माझ्याबद्दल बोलून जनतेचं लक्ष वेगळ्या विषयाकडे वळवायचे आहे. ज्या महिलांना मदतीची गरज आहे त्यांच्यासाठी तुम्ही प्रत्यक्षात काही का करत नाही? महिलांचे शिक्षण, प्रलंबित असलेली बलात्काराची प्रकरणे, याकडे तुम्ही लक्ष का देत नाही?’ आता उर्फीचा रिप्लाय चर्चेत आला आहे. नेटकरी या उत्तराला सकारात्मकही बाजूने घेत आहेत तर काही यावर उलट सुलट प्रतिक्रिया देत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम