दुचाकीला पेट्रोल आणि डिझेल फक्त २०० रुपयांना, चारचाकीला ५०० रुपयांना मिळणार, सरकारने ठरवली मर्यादा

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ०३ मे २०२४ । तुम्ही स्वतःच्या कारने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. वास्तविक, त्रिपुरा सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या खरेदी-विक्रीची मर्यादा निश्चित केली आहे. याअंतर्गत दुचाकी वाहनांना दररोज केवळ २०० रुपये तर चारचाकी वाहनांना केवळ ५०० रुपयांपर्यंत पेट्रोल आणि डिझेल मिळू शकणार आहे. राज्यात येणाऱ्या मालगाड्या विस्कळीत झाल्यामुळे इंधनाच्या साठ्यातील कमतरता लक्षात घेऊन सरकारने हे पाऊल उचलले आहे.

आसाममधील जटिंगा येथे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाल्यामुळे त्रिपुराकडे येणाऱ्या मालगाड्या विस्कळीत झाल्या आहेत. दुरुस्तीच्या कामानंतर, २६ एप्रिल रोजी प्रवासी रेल्वे सेवा पूर्ववत करण्यात आली होती, परंतु रात्रीच्या वेळी जटिंगा मार्गे रेल्वे सेवा अजूनही बंद आहे.

१२५ शाळांना ई-मेलद्वारे बॉम्बची धमकी; सविस्तर वाचा काय आहे प्रकरण

अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे अतिरिक्त सचिव निर्मल अधिकारी म्हणाले, ‘राज्यातील मालगाड्यांची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यात घट झाली आहे आणि त्यामुळे विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. इंधन – पेट्रोल आणि डिझेल १ मे पासून पुढील आदेशापर्यंत काही निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अन्न व नागरी पुरवठा विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, ‘दुचाकी वाहनांना २०० रुपयांपर्यंत आणि चारचाकी वाहनांना ५०० रुपयांपर्यंत पेट्रोल खरेदी करता येणार आहे,’ असे आदेशात म्हटले आहे दिवसाला एक बस फक्त ६० लिटर डिझेलची विक्री करण्यास सांगितले आहे, तर मिनी बस, ऑटो रिक्षा आणि तीनचाकी वाहनांसाठी ही मर्यादा अनुक्रमे ४० आणि १५ लिटर असेल.

‘आरटीई’ प्रवेशांच्या नोंदणीसाठी मुदतवाढ… जाणून घ्या कधीपर्यंत भरता येणार अर्ज?

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम