राज्यातील जनतेला दिलासा : पेट्रोलच्या किंमती बदलले !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १८ फेब्रुवारी २०२३ । राज्यात मोठ्या उत्साहात महाशिवरात्र साजरी केली जात आहे याच दिवशी नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शनिवारी जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. आज WTI क्रूड 2.74 टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल 76.34 डॉलरवर व्यापार करत आहे. ब्रेंट क्रूड देखील 2.14 (2.51%) ने घसरून 83 डॉलरवर पोहोचलं आहे. देशातील तेल कंपन्यांनी दररोज सकाळप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल केला आहे.

अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल झाल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रात पेट्रोलचा दर 1.02 रुपयांनी कमी होऊन 106.15 रुपये प्रतिलिटर झाला आहे. डिझेल 99 पैशांनी घसरून 92.67 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. याशिवाय अनेक राज्यांमध्ये इंधनाचे दर वाढले आहेत. पंजाबमध्ये पेट्रोल 22 पैशांनी तर डिझेल 23 पैशांनी महागलं आहे. उत्तर प्रदेशातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 22 पैशांची वाढ झाली आहे. तामिळनाडू, राजस्थान, हरियाणा आणि कर्नाटकातही पेट्रोल डिझेल महाग झालं आहे.

प्रमुख महानगरांमधील दर दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर नोएडामध्ये पेट्रोल 96.79 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रतिलिटर झाले आहे. गाझियाबादमध्ये 96.58 रुपये आणि डिझेल 89.75 रुपये प्रति लिटर. लखनौमध्ये पेट्रोल 96.47 रुपये आणि डिझेल 89.66 रुपये प्रतिलिटर झाले आहे. पाटणामध्ये पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर झाले आहे. पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर झाले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम