मोठी बातमी : संजय राऊत यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ६ जानेवारी २०२३ राज्यातील ठाकरे गट व भाजपचे आता भांडण चांगलेच रंगू लागले आहे. शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत यांच्याविरोधात मुंबईच्या शिवडी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणात हे अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे.

मेधा सोमय्या यांनी शिवडी न्यायालयात दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात संजय राऊत हे सुनावणीदरम्यान सतत गैरहजर होते. त्यामुळे त्याच्याविरोधात वॉरंट जारी करण्याची मागणी करण्यात आली होती. ही माहिती देताना किरीट सोमय्या म्हणाले की, आज (शुक्रवार) न्यायालयाने मेधा सोमय्या यांचे सुमारे तासभर जबाब नोंदवले. त्यानंतर न्यायालयाने राऊतविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 24 जानेवारीला होणार आहे.

मेधा सोमय्या यांनी आरोप केला की संजय राऊत यांनी आपल्या विरोधात खोटी विधाने केली आणि 100 कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्यात आपला सहभाग असल्याचा आरोप केला. यामुळे माझी बदनामी झाली आणि प्रतिमा मलिन झाली. त्यांनी नवघर पोलीस ठाण्यात (मुलुंड, मुंबई) राऊत यांच्याविरोधात एफआयआरही दाखल केला आहे.शौचालय घोटाळ्याचा आरोप करून संजय राऊत यांनी आपला छळ आणि बदनामी केल्याचा आरोप मेधा सोमय्या यांनी केला आहे. संजय राऊत हे किरीट सोमय्यांची पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर टॉयलेट घोटाळावरुन वेगवेगळे आरोप केले होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम