राज्यात दंगली घडविण्याच्या डाव : खा.संजय राऊत !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २० नोव्हेबर २०२३

मराठा-ओबीसी समाजातील वाद हा महाराष्ट्राच्या परंपरेला आणि संस्कृतीला शोभणारा आणि अखंडतेला परवड‌णारा नाही. कोणीतरी वाद पेटवतोय आणि रिंगणाच्या बाहेर राहून मजा पाहतोय. मराठा-ओबीसी वाद घडवून राजकीय पोळी भाजण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर ते छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचे नुकसान करत आहेत. आता धर्माच्या नाही तर जातीच्या नावाखाली राज्यात दंगली घडवण्याचा डाव आहे, असा गंभीर आरोप शिवसेना (ठाकरे) संजय राऊत यांनी केला.

खासदार संजय राऊत यांनी रविवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सध्या मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावरून राज्य सरकारसह भाजपवर सडकून टीका केली. राऊत म्हणाले, राज्यात सध्या दलित, आदिवासी व ओबीसी समाजाला ५० टक्क्यांच्या मर्यादेत आरक्षण आहे. मात्र, मराठा समाजासह इतर समाजाची आरक्षणाची मागणी लक्षात घेता शिवसेनेच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन वाढवावी व मराठासह धनगर व इतरांच्या मागण्यांनुसार समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी केली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम