सातपुडा परिसरात निसर्ग प्रेमी मित्र परिवाराच्या वतीने 1000 पेक्षा जास्त झाडांचे रोपण

बातमी शेअर करा...

 

सातपुडा परिसरातील निसर्ग प्रेमी व मित्र परिवार तसेच आडबाल परिवाराच्या वतीने मेहरुण परिसरात गेल्या तीन आठवड्यांपासून वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमात 1000 पेक्षा जास्त नीम, आंबा, बेल, जांभूळ, वड आणि इतर वृक्षांच्या बीजांचे रोपण करण्यात आले.

वृक्षारोपण कार्यक्रमाचे प्रमुख सहभागी

सदरील कार्यक्रमात “झाडे लावा, झाडे जगवा” या अभियानाचे उद्घाटन संकेत बिल्डरचे संचालक यशवंत बारी व ज्येष्ठ पत्रकार शिवलाल बारी यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून योगराज महाजन, महेश बाहेती, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जळगाव जिल्हाध्यक्ष मिलिंद दादा सोनवणे, विजय बारी, प्रविण बारी, अरुण बारी, गोपाल बारी, योगेश घोलप, बाळु बारी, चेतन बांगर, प्रदीप पवार, तसेच विद्यार्थी मित्र संस्कार सोनवणे आणि अतुल गोपाळ उपस्थित होते.

 पुढील योजना

“झाडे लावा, झाडे जगवा” या घोषणेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. आयोजकांनी पुढील भागांमध्येही हा कार्यक्रम राबविण्याची तयारी दर्शवली आहे. प्रत्येक रविवारी वृक्षारोपण करून झाडे जगविण्याच्या संकल्पाने हे अभियान चालविण्यात येणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम