पंतप्रधान मोदी भाजपमधील नेतृत्व संपवताय ; प्रकाश आंबेडकर !
दै. बातमीदार । २३ जानेवारी २०२३ । आज बाळासाहेबांच्या जयंतीच्या मुहूर्तावर शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा झाली आहे. यावेळी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.ठाकरे गट आणि वंचित आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वपक्षातील नेतृत्त संपवल्याचा हल्लाबोल वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. आंबेडकर म्हणाले की, सध्या राष्ट्रीय नेतृत्व करणारं एकही राजकीय नेतृत्त्व नसल्याचे ते म्हणाले. ईडीच्या माध्यमातून देशातलं राजकीय नेतृत्त्व संपण्याचा घाट घातला जातोय असा आरोपही आंबेडकरांनी यावेळी केला.
आज ईडीच्या मार्फत पॉलिटिकल लीडरशिपवर आक्षेप घेण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणाले. मात्र, कोणीही अमरपट्टा घेऊन आलेला नसून, नरेंद्र मोदींचासुद्धा एक दिवस अंत पक्षात होणार असल्याचे म्हणत मोदींनीच त्यांच्या पक्षातील लीडरशिप संपवली असल्याचे आंबेडकर म्हणाले. फक्त फाईली उचलून घेऊन जायचं आमचं काम असल्याचे त्यांच्यातले अनेक मंत्री म्हणतात असेही आंबेडकरांनी यावेळी सांगितले. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वो शरद पवारांवरही भाष्य केले. ते म्हणाले की, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत शेतातील भांडण नाहीत, तर त्यांच्यासोबत मुद्याची भांडण आहेत. शरद पवार आमच्यासोबत येतील अशी अपेक्षा बाळगतो असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. राष्ट्रवादी आणि काँग्रेस आमची युती स्वीकारतील अशी अपेक्षाही आंबेडकरांनी यावेळी व्यक्ती केली.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम