पंतप्रधान मोदी पोहचले भाजप कार्यालयात ; महिलांच्या पडले पाया !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २२ सप्टेंबर २०२३ | केंद्र सरकारने 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले होते. 20 सप्टेंबर रोजी लोकसभेत 7 तासांच्या चर्चेनंतर हे विधेयक मंजूर करण्यात आले. त्याच्या बाजूने 454 तर विरोधात 2 मते पडली. यानंतर पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी भाजप कार्यालयात पोहोचले. पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी त्याठिकाणी त्यांचे स्वागत केले.

यावेळी मोदींनी महिलांच्या पाया पडत आशीर्वाद घेतले. महिला आरक्षण विधेयक मंजूर केल्याबद्दल पीएम मोदींचे आभार मानण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा देखील याठिकाणी उपस्थित आहेत.

शुक्रवारी सकाळपासूनच भाजपच्या कार्यालयाबाहेर महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. गुलालाची उधळण करून आणि मिठाई वाटून ते विधेयक मंजूर झाल्याचा आनंद साजरा करत आहेत. केंद्र सरकारने 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले होते. 20 सप्टेंबर रोजी लोकसभेत 7 तासांच्या चर्चेनंतर हे विधेयक मंजूर करण्यात आले. त्याच्या बाजूने 454 तर विरोधात 2 मते पडली. 21 सप्टेंबर रोजी हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात आले. सभागृहात उपस्थित सर्व 214 खासदारांनी विधेयकाला पाठिंबा दिला आणि विधेयक मंजूर करण्यात आले. आता हे विधेयक विधानसभांमध्ये पाठवले जाणार आहे. 50% विधानसभांनी पास केल्यानंतर ते राष्ट्रपतींकडे पाठवले जाईल. त्यांच्या स्वाक्षरीने त्याचे कायद्यात रुपांतर होईल. 22 सप्टेंबरला संपणारे हे विशेष अधिवेशन 21 सप्टेंबरला राज्यसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर होऊन संपलं. विधेयक मंजूर झाल्यावर पीएम मोदी म्हणाले – देशातील सर्व राजकीय पक्षांचा या विधेयकाबाबतचा सकारात्मक विचार आपल्या देशातील महिला शक्तीला नवी ऊर्जा देणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम