पंतप्रधान मोदीनी राज्याला सांगितले ‘वारंवार निवडणूक कशा जिंकाव्या’

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ११ डिसेंबर २०२२ ।  देशातील महत्वाची मानली जाणारी गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपनं ऐतिहासिक विजय मिळवला. यांसह जिंकण्याची सवय लागलेल्या पंतप्रधान मोदींनी निवडणुका कशा जिंकल्या जातात याचा मंत्र राज्याला त्यांनी रविवारी सांगितला.

मोदी म्हणाले, “गुजरातमध्ये निवडणुकीचा जो निकाल आला आहे, तो स्थायी विकास आणि त्यासंबंधीच्या आर्थिक नितीचा परिणाम आहे. मी शॉर्टकट घेणाऱ्या राजकारण्यांना देखील विनम्रता पूर्वक आदरपूर्वक सांगेन की, स्थायी विकासाच्या व्हिजनला समजून घ्या. त्याचं महत्व समजून घ्या. आज देशाला त्याची गरज आहे ते समजून घ्या. शॉर्टकटशिवाय स्थायी विकास करुनही तुम्ही निवडणुका जिंकू शकता. वारंवार निवडणूक जिंकू शकता. अशा स्थायी विकासावर लक्ष केंद्रीत करणाऱ्या राजकीय पक्षांना मी सांगू इच्छितो की त्यांनी घाबरण्याची गरज नाही. कारण मला विश्वास आहे की तुम्ही देशहित सर्वोतोपरी ठेवाल तर शॉर्टकच्या राजकारणाचा रस्ताही सोडून द्याल”

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम