उर्फीला पोलिसांनी घेतले ताब्यात ? चाहत्यांची वाढली चिंता !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ३ नोव्हेबर २०२३

आपल्या विचित्र व हटके फॅशनमुळे नेहमीच चर्चेत राहणारी उर्फी जावेद पुन्हा एकदा नव्या वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकली आहे. तिला जीवे मारण्याच्या धमक्या देखील आल्या आहेत. असे असताना देखील उर्फी जावेद न घाबरता पुन्हा नव्या ड्रेसिंग स्टाईलमध्ये कॅमेऱ्यापुढे येत. आता सध्या उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यामागचे कारण म्हणजे उर्फी जावेदला पोलिसांनी अटक केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

उर्फी जावेदला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. दोन महिला पोलिस तिला सोबत घेऊन जात असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हायरल भियानीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. उर्फी जावेदला खरंच अटक झाली आहे की नाही हे अद्याप समोर आले नाही. पण हा व्हिडीओ समोर आल्यानंतर उर्फीचे चाहते चिंतेत आले आहेत. पोलिसांनी तिला का अटक केले असा प्रश्न त्यांना पडला आहे.

 

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, उर्फी जावेद कॉफी शॉपमध्ये असल्याचे दिसत आहे. त्याचवेळी या कॅफेच्या बाहेर पोलिसांची गाडी येते. दोन महिला पोलिस या कॉफी शॉपच्या बाहेर जाऊन उर्फीला बोलावतात. उर्फी पोलिसांकडे येते खरं पण पोलिस तिला आमच्यासोबत पोलिस ठाण्याला यावे लागेल असे सांगताना दिसतात. उर्फी पोलिसांना ताब्यात घेण्यामागचे कारण विचारत हुज्जत घालते.. तर पोलिस तिला म्हणतात इतके छोटे कपडे घालून कोण फिरते? त्यानंतर पोलिस उर्फीला गाडीमध्ये बसवतात आणि घेऊन जातात. उर्फी जावेदचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. उर्फीला पोलिसांनी का अटक केली असा प्रश्न नेटिझन्सला पडला आहे. तसंच तिचे चाहते देखील चिंतेत आले आहे. तर दुसरीकडे हा प्रमोशनल व्हिडीओ असल्याच्या कमेंट्स नेटिझन्स करत आहेत. काही नेटिझन्सनी असे म्हटले आहे की, ‘हा एक प्रकारचा प्रमोशनल व्हिडीओ आहे. तो एक बझ तयार करण्यासाठी केला आहे. सत्य काय आहे ते भविष्यात कळेल.’

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम