गरीब पुन्हा चुलीकडे ; गॅस सिंलिडरवर वर्षभरात झाली २२ टक्के वाढ !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १६ एप्रिल २०२३ ।  देशात महागाईचा डोंगर दिवसेदिवस वाढत चाललेला आहे. यामुळे सर्वसामान्यांवर महागाईचे संकट आले आहे. जीवनावश्‍यक वस्तूंचे दर सतत वाढत आहेत. गॅस सिंलिडर तर अकराशे रूपयांवर गेल्याने गरिबांना पून्हा चुलीकडे वळावे असे वाटू लागले आहे.

विशेषत: कोरोनानंतर सिलिंडरच्या दरात वाढच होत आहे. केंद्र शासनाकडून मिळणारी सबसिडीही बंद झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांना सिलिंडरचा खर्च झेपवत नसल्याचे चित्र आहे. गेल्या दोन वर्षांत सातत्याने होत असलेल्या पेट्रोल, डिझेल आणि सिलिंडरच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य जेरीस आले आहेत. कोरोना संकटानंतर अनेकांची आर्थिक घडी विस्कटली. त्यामुळे दरवाढीपासून दिलासा मिळावा, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. प्रत्यक्षात मात्र अत्यावश्यक असलेले इंधन आणि सिलिंडर दिवसेंदिवस महागच होत चालले आहे.

गेल्या काही महिन्यांत पेट्रोल-डिझेलचे दर काही प्रमाणात स्थिर आहेत. मात्र, सिलिंडर दरवाढीचा मटका सुरू आहे. मार्च २०२२ ते मार्च २०२३ दरम्यान घरगुती वापराचा सिलिंडर सुमारे २२.५ टक्क्यांनी (२०३ रूपयांनी) महागला आहे.

एक मार्च २०२२ ला घरगुती वापराचा १४ किलोचा सिलिंडर ९०२ रुपयांना मिळत होता. एक एप्रिल २०२३ला तो १ हजार १०५ रुपयांना झाला. भविष्यात ही किंमत आणखी वाढण्याची शक्यता आहे. जुलै २०२२ ते जानेवारी २०२३ दरम्यान मात्र हे दर स्थिर होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम