ऋषभच्या अपघातानंतर उर्वशी पोस्ट म्हणाले… सौंदर्याकडे न पाहता !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३० डिसेंबर २०२२ । उत्तराखंडवरुन दिल्लीकडे प्रवास करत असताना ऋषभच्या कारला अपघात झाल्यानंतर भारतीय क्रिकेट विश्वाला मोठा धक्का बसला आहे. पंत या अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चाहत्यांनी आपल्या लाडक्या ऋषभसाठी देवाचा धावा सुरु केला आहे. तो लवकरात लवकर या संकटातून बाहेर यावा म्हणून देवाला साकडेही घातले आहे. यासगळ्यात अनेक सेलिब्रेटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यात ऋषभची मैत्रीण उर्वशीच्या प्रतिक्रियेनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभची मर्सिडिज दिल्ली – डेहराडून महामार्गावर एका डिव्हायरडला धडकली. यासगळ्यात उर्वशीची प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. यावेळी चाहत्यांना आठवण आली ती उर्वशीची. तिनं यासगळ्या अपघातावर काय प्रतिक्रिया दिली आहे याची अनेकांना उत्सुकता होती. उर्वशीच्या इंस्टा अकाउंटवर नेटकऱ्यांनी कमेंट करण्यास सुरुवात केली आहे. त्यात एकानं तर तू अजुनही कोणतीही प्रतिक्रिया का दिलेली नाही असा सवाल तिला विचारला आहे.

 

उर्वशीनं काही वेळेपूर्वी एक फोटो शेयर केला आहे. त्यामध्ये ती वेगळ्याच रुपात दिसते आहे. यावेळी तिनं लिहिलं आहे की…प्रार्थना… याप्रसंगी नेटकऱ्यांनी तिच्या सौंदर्याकडे न पाहता दिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. आपण कसे वागतो आहोत यावेळी काय महत्वाचे आहे याचा साधा विचारही उर्वशी करु शकत नाही का…अशा शब्दांत नेटकऱ्यांनी तिला सुनावले आहे.
उर्वशीनं आपल्या त्या पोस्टमध्ये एका वेगळ्या लूकमधील फोटो शेयर केला असून त्याला प्रेयर अशी कॅप्शन दिली आहे. त्यावरुन नेटकऱ्यांनी तिनं ऋषभसाठी खास पोस्ट शेयर केल्याचा अंदाज लावला आहे. ऋषभच्या त्या घटनेनंतर काही वेळेतच तिनं ही पोस्ट शेयर केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम