प्रकाश आंबेडकर व जरांगे यांची अर्धा तास चर्चा !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ५ सप्टेंबर २०२३ | अंतरवली येथे मराठा आंदोलकांची वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भेट घेतली. प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलक मनोज जरांगे यांच्यासोबत जवळपास अर्धा तास चर्चा केली. आंबेडकर यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी त्यांनी महत्वाचा सल्ला देखील दिला.

आरक्षणाच्या यादीत मराठा समाजाचा उल्लेख बाबासाहेब आंबेडकर यांनी केला होता. शिक्षण मराठा समाजापर्यंत पोहचवायचं असेल तर मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशी भूमिका त्यावेळी होती. शिक्षणापासून वंचित राहिलेल्यांच्या समुहाची सूची करुन त्यांना इतरांच्या बरोबरित आणण्याचा बाबासाहेब आंबेडकरांचा आग्रह होता. त्यानंतर घटना समिती मान्य झाली. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे सरकार आले. पण यावेळी बाबासाहेबांना लक्षात आलं की घटना समितीचा अध्यक्ष म्हणून मागास्वर्गींयांना दिलेलं वचन साध्य होत नाही. महिंलांना अधिकार देण्याच वचन देखील पाळल्या जात नाही, म्हणून त्यांनी नेहरुंच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिला, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

यशवंतराव चव्हाण विचारवंत होते त्यांनी ईबीएस संकल्पना काढली होती. इतर विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा आर्थिक दुष्टीकोणातून मिळेल. माणूस जसा श्रीमंत होतो तसा तो गरीबांकडे लक्ष देत नाही, हीच परिस्थीती समाजात देखील आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. प्रकाश आंबेडकर म्हणाले, शासनातील मंडळींचा मानसिक दृष्टिकोन आपल्याला बदलावा लागले. त्यांनी व्यवस्थेला आणि कोर्टाला अंगावर घेणे शिकले पाहिजे. तेव्हा प्रश्न मार्गी लागयला वेळ लागणार नाही. आरक्षण द्यायला कोर्टाचा विरोध नाही. पण मराठा समाजाला खरच आरक्षणाची गरज आहे का, हे शासनाने सिद्ध करावे, तर आमचा कुठेही अडथळा नाही, अशी कोर्टाची भूमिका आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम