डॉ प्रशांत पाटील यांना राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार प्राप्त

बातमी शेअर करा...

पारोळा

येथील डॉ प्रशांत पाटील यांना कोल्हापूर येथे नुकताच राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार मिळाला.

दि २२ रोजी कोल्हापूर येथे छत्रपती शाहू महाराज नगरीत इंजीनियरिंग असोसिएशन हॉल शिवाजी उद्यम नगर पार्वती टॉकीज येथे जनकल्याण सामाजिक सेवा संस्था कोल्हापूर यांनी सामूहिक शिक्षणाचे प्रणेते कर्मवीर भाऊराव पाटील जयंती निमित्त राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गुणीजनांचा गौरव करण्यात आला.

या सोहळासाठी राज्यातील विविध मान्यवरांची उपस्थितीत होते. पारोळा येथून डॉ प्रशांत गोरख पाटील यांचा सहत्नीक राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष मा. महेशराव जाधव , राज्य सचिव भाजपा कोल्हापूर तर प्रमुख पाहुणे म्हणून कर्मवीर ह भ प भगवान कोकरे महाराज चिपळूण रत्नागिरी गोसेवक, तसेच जनकल्याण सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष मा. उदयसिंग पाटील संपादक कोल्हापुरी बाणा यांच्यासह या शानदार सोहळ्यासाठी राज्यतिल विविध मान्यवरांच्या उपस्थिती होती

सामूहिक शिक्षणाचे प्रणेते कर्मवीर भाऊराव पाटील जयंती निमित्त पर्यावरण साहित्य संमेलन, कविता वाचन, मोफत पुस्तक वाटप, व्याख्यान व राज्यस्तरीय पुरस्काराने गुणीजणांचा गौरव असा कार्यक्रमाचे आयोजन केले होते या सोहळ्यामध्ये डॉ प्रशांत गोरख पाटील यांना अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, आरोग्य सेवा, मार्गदर्शन, स्रिभृणहत्या वधू-वरांचे विवाह मार्गदर्शन इत्यादी उल्लेखनीय समाजकार्याबद्दल राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.

डॉ. पाटील त्यांच्या धर्मपत्नी सौ अलका प्रशांत पाटील, कु डॉ प्रियंका प्रशांत पाटील, चि डॉ विवेकानंद प्रशांत पाटील हे सोबत उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम