पत्रकारांनी मूल्याधिष्ठित पत्रकारिता करीत शाश्वत मूल्ये जोपासावी ; राज्यपाल जळगाव चे मुफ्ती हारून नदवी राज्यपालांच्या हस्ते सन्मानित.

बातमी शेअर करा...

अमळनेर (आबिद शेख) वृत्तांकन करतांना खरेपणा, निर्भीडता असावी, पण खोटेपणा नसावा. पत्रकारांनी मूल्याधिष्ठित पत्रकारिता करत शाश्वत मूल्ये जोपासावी, अशी अपेक्षा राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांनी व्यक्त केली.
राजभवन (मुंबई) 7 डिसें. रोजी राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत “व्हॉईस ऑफ मिडिया ‘ या प्रसार
माध्यम प्रतिनिधींच्या देशव्यापी संघटनेच्या संकेत स्थळाचे उदघाटन तसेच संघटनेच्या पद्ग्रहण सोहळ्यात ते बोलत होते.
या वेळी राज्यपालांनी संघटनेच्या सदस्यांना संविधानाच्या कक्षेत काम करण्याची तसेच पत्रकारितेची मूल्ये जपण्याची प्रतिज्ञा दिली. या वेळी संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय सरचिटणीस चंद्र मोहन पुप्पाला, राज्याध्यक्ष राजा माने, उर्दू विंग चे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती हारून नदवी, महिला प्रदेशाध्यक्ष शैलजा जोगल आदींना राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
*महाराष्ट्र उर्दू विभाग प्रमुख मुफ्ती नदवी*

*या संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उर्दू विभागा च्या प्रमुख पदी प्रथमतः जळगाव व्हायरल न्यूज तथा नदवी टाइम्स चे प्रमुख मुफ्ती हारून नदवी यांची निवड झाली आहे*

महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे,भिवंडी,औरंगाबाद, येथील उर्दू पत्रकार ऐवजी जळगाव मधील अत्यंत कमी वेळात राष्ट्रीय पातळीवर इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडिया च्या माध्यमाने मुफ्ती हारून यांनी केलेल्या कार्याची नोंद म्हणजे ही निवड असल्याचे प्रतिपादन या वेळी करण्यात आले

या प्रसंगी संघटनेचे राष्ट्रीय, प्रदेश पदाधिकारी, उत्तर महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष नरेश होळनार, जळगाव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सुरेश उज्जैनवाल, या सह राज्यातील जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. ही संघटना देशातील 21 राज्यात पसरली असून 18 हजार माध्यम प्रतिनिधी
संस्थांना जोडले गेलेले आहेत.
पत्रकाराच्या प्रश्नांवर लढा देण्या बरोबरच समाजात सकारात्मकतेचे बीज परण्याचं काम या पुढील काळात करणार असल्याची ग्वाही या वेळी संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी दिली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम