पंतप्रधान मोदी मुंबई विमानतळावर दाखल ; मुख्यमंत्र्यांनी केले स्वागत !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १४ ऑक्टोबर २०२३

देशात आगामी लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुरु असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई विमानतळावर पोहोचले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं.

पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर राज्यपाल रमेश बैस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते. मुंबई विमानतळा बाहेरील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील मुख्य रस्ता आता सामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आला असून पंतप्रधान मोदी हे वांद्रे येथील कार्यक्रमासाठी रवाना झाला आहेत.

जियो वर्ल्ड सेंटर इथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या 141 व्या सत्राचे उद्‌घाटन हे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यासाठी ते मुंबईत आले आहेत. हे सत्र, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या सदस्यांची एक महत्वाची बैठक मानली जाते. या सत्रात ऑलिंपिक स्पर्धांच्या भविष्याशी संबंधित महत्वाचे निर्णय घेतले जातात. भारतात ही बैठक दुसऱ्यांदा होत आहे. याधीची बैठक सुमारे 40 वर्षांपूर्वी झाली होती. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे 86 वे सत्र, नवी दिल्लीत 1983 साली झाले होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम