राज्यातील ‘या’ जिल्हा दौऱ्यावर १ ऑगस्टला पंतप्रधान नरेद्र मोदी !
बातमीदार | ३० जुलै २०२३ | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याच्या दौऱ्यावर १ ऑगस्ट मंगळवारी पुणे येथे येत आहे. यादरम्यान ते विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीही करणार आहेत. तसेच पंतप्रधान मोदी हे पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ मंदिरात दर्शन घेऊन पूजा देखील करणार आहेत. दरम्यान पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) रविवारी (३० जुलै) दिलेल्या निवेदनात याबद्दल माहिती दिली आहे. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
पीएमओने दिलेल्या माहितीनुसार, पुणे मेट्रोच्या पहिल्या दोन कॉरिडॉरच्या पूर्ण झालेल्या सेवेच्या उद्घाटनानिमित्त पंतप्रधान मेट्रो ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. ही मेट्रो फुगेवाडी स्टेशन ते सिव्हिल कोर्ट स्टेशन आणि गरवारे कॉलेज स्टेशन ते रुबी हॉल क्लिनिक स्टेशन पर्यंत राहणार आहे. 2016 मध्ये पंतप्रधानांनी या प्रकल्पाची पायाभरणीही केली होती. नवीन टप्पा सुरू झाल्याने पुणे शहरातील शिवाजी नगर, दिवाणी न्यायालय, पुणे महानगरपालिका कार्यालय, पुणे आरटीओ आणि पुणे रेल्वे स्टेशन यासारखी महत्त्वाची ठिकाणे जोडली जातील.
पंतप्रधान मोदी या दौऱ्या वेळी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत PCMC ने बांधलेली 1,280 हून अधिक घरे देखील सुपूर्द करतील. तसेच ते पुणे महानगरपालिकेने बांधलेली 2,650 पीएमएवाय घरे देखील सुपूर्द करतील. याशिवाय, PCMC द्वारे बांधण्यात येणार्या सुमारे 1,190 पीएमएवाय घरांची आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे बांधण्यात येणार्या 6,400 हून अधिक घरांची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम