पंतप्रधान मोदी उद्या घेणार शास्त्रज्ञांची भेट !
बातमीदार | २५ ऑगस्ट २०२३ | भारताची महत्वाकांक्षी असलेले मिशन चांद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरून इतिहास रचला आहे. विक्रम लँडर चंद्रावर उतरण्याच्या काही क्षण आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथून लाईव्ह स्ट्रिमिंगद्वारे सहभागी झाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चार दिवसांच्या परदेश दौऱ्यावर आहेत, 26 ऑगस्टला ते भारतात परतणार असल्याचं म्हटलं जात आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ब्रिक्स परिषदेसाठी ते सध्या जोहान्सबर्ग येथे आहे. यावेळी त्यांनी चांद्रयान – 3 चं लँडिंग झाल्यानंतर इस्रोशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी त्यांनी या ऐतिहासिक क्षणाचं कौतुक करत इस्रोच्या शास्रज्ञांना फोनवरुन शुभेच्छा देखील दिल्या. हा भारतासाठी एक नवा सुर्योदय असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी म्हटलं.
चांद्रयान-3 च्या भव्य यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशातील सर्व नेत्यांनी इस्रोचं तोंडभरून कौतुक केलं आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशात परतताच 26 ऑगस्टला बंगळूरू येथे जाऊन इस्रोच्या शास्त्रज्ञांची भेट घेणार असल्याची माहिती मिळते आहे. चांद्रयान-3 मोहिमेच्या यशामुळे भारत हा चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणारा जगातील चौथा आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. पंतप्रधान मोदींनी दक्षिण आफ्रिकेतून चांद्रयान-3 चं लाईव्ह लँडिंग पाहिलं. इस्रोचं मिशन यशस्वी होताच पंतप्रधान मोदींनी इस्रो प्रमुखांशी फोनवरुन संवाद साधला. यानंतर आता मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी 26 ऑगस्ट रोजी बंगळुरू येथे जाऊन इस्रोच्या शास्त्रज्ञांची भेट घेणार आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम