पंतप्रधान मोदी यांच्या बंधूच्या चारचाकीचा अपघात ; तीन गंभीर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २७ डिसेंबर २०२२ ।  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांच्या चारचाकी कारला कर्नाटकातील म्हैसूरमध्ये अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रल्हाद मोदी यांच्यासोबत कारमध्ये मुलगा आणि सून प्रवास करत होते. या घटनेत तिघेही गंभीर जखमी झाले असून, उपचारांसाठी त्यांना जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

म्हैसूर जवळील कडकोल्ला परिसरात हा अपघात दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास झाल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले. प्रल्हाद मोदी हे गुजरात फेअर प्राइस शॉप्स अँड केरोसीन लायसन्स होल्डर असोसिएशनचे प्रमुख आहेत. मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात एका सामाजिक कार्यक्रमात गुजरातच्या जनतेने भाजपला निवडून दिले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम