पंतप्रधान मोदींचे केदारनाथ दर्शन ; पंतप्रधान झाल्यानंतर सहाव्यांदा घेतले दर्शन

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २१ ऑक्टोबर २०२२ । पंतप्रधानपदी नरेद्र मोदी विराजमान झाल्यानंतर त्यांचा हा ६ वा केदारनाथ दौरा असल्याची माहिती आहे. त्यांनी शुक्रवारी सकाळी बाबा केदारनाथांचे दर्शन घेतले. गर्भगृहात जवळपास 20 मिनिटे पूजाअर्चा केल्यानंतर त्यांनी बाहेर येऊन परिसराचा आढावा घतेला.बाबांच्या दर्शनासाठी त्यांनी हिमाचली टोपी व खास पोशाख चोला-डोरा घातला होता.

चंबाच्या महिलांनी हा पोशाख मोदींना गिफ्ट केला होता. त्यावर मागच्या साइडने स्वस्तिकचे चिन्ह आहे. बाबांच्या दर्शनानंतर मोदींनी आदी शंकराचार्यांच्या समाधीचेही दर्शन घेतले. 12 फूट उंच आदि शंकराचार्यांचा हा पुतळा 28 टन वजनी आहे. तो म्हैसूरच्या ग्रॅनाइट दगडांपासून तयार करण्यात आला आहे.

पीएम मोदींची भेटी आणि दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर केदारनाथ मंदिराला 10 क्विंटल फुलांनी सजवण्यात आलं आहे. यावेळी मोदींनी नतमस्तक होऊन बाबा केदारनाथाचं दर्शन घेतलं. विशेष म्हणजे, पीएम मोदींची या वर्षातील ही सहावी केदारनाथ भेट आहे. पंतप्रधान मंदिरात जागतिक शांतता आणि विश्व कल्याणासाठी महाभिषेक देखील करणार आहेत.

मोदी 8 वर्षांत सहाव्यांदा केदारनाथला पोहोचलेत. या दौऱ्यात ते 3400 कोटींहून अधिक रूपयांच्या विकास योजनांची पायाभरणी करतील. यासंबंधीच्या वृत्तानुसार, पीएम मोदी केदारनाथ रोप-वे प्रकल्पाची पायाभरणी करतील. हा रोप-वे 9.7 किमी लांब असून, तो गौरीकुंडाला केदारनाथशी जोडेल. सध्या हे अंतर कापण्यासाठी जवळपास 6 तास लागलात. रोप-वे बनल्यानंतर हा प्रवास अवघ्या 30 मिनिटांत होईल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम