पंतप्रधान मोदींच्या मातोश्रींची बिघडली प्रकृती !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २८ डिसेंबर २०२२ । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. अहमदाबादमधील यूएन मेहता रुग्णालयात हिराबा यांना मंगळवारी रात्री दाखल करण्यात आले. हिराबेन यांना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आल्याचे प्राथमिक वृत्त आहे. मोदी दुपारी 3 वाजता अहमदाबादला पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गुजरात निवडणुकीच्या मतदानादरम्यान 4 डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदींनी त्यांच्या मातोश्री हिराबेन यांची गांधीनगरमध्ये भेट घेतली. यावेळी त्यांनी आईच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतले आणि त्यांच्यासोबत बसून चहा प्यायला. गुजरात निवडणुकीपूर्वी 18 जून रोजी मोदींनी त्यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आईची भेट घेतली होती. यापूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 आणि 12 मार्च रोजी गुजरातच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असताना, 11 मार्च रोजी रात्री 9 वाजता मातोश्री हिराबेन यांना भेटण्यासाठी ते गांधीनगरला पोहोचले होते, जिथे त्यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले होते. यावेळी पीएम मोदींनी त्यांच्यासोबत खिचडीही खाल्ली होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम