पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत ; प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी !
दै. बातमीदार । १९ जानेवारी २०२३ । मुंबई महानगरपालिकेच्या पूर्वी शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदा मुंबई दौऱ्यावर येत आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी ३८ हजार ८०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. मुंबईत बीकेसी मैदानावर मोठ्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेत नरेंद्र मोदी संबोधित करतील. नरेंद्र मोदींच्या या दौऱ्यावर विरोधक टीका करत आहेत.
अरबी समुद्रात नरेंद्र मोदी यांनी २४ डिसेंबर २०१६ साली ‘शिवस्मारका’साठी जलपूजन केले होते. परंतु अजून या कामाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे आता मोदी उद्घाटन करत असलेले काम कधी पूर्ण होणार, अशी चर्चा होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे मुंबई येथील ‘शिवस्मारका’चे काम अद्याप सरकारद्वारे करण्यात आलेले नाही. फडणवीस सरकार असताना या स्मारकासाठी जलपूजन करण्यात आले होते. या स्मारकाकरीता आवश्यक त्या सर्व अनुमती असतांनाही स्मारक उभारणीस विलंब होत आहे. या भूमिपुजनाला सात वर्षे उलटूनही अद्याप स्मारकाची एकही विट चढलेली नाही. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवमस्मारकाचे भूमिपुजन झाल्यानंतर स्मारक उभारणीच्या पहिल्या टप्प्याच्या कामाची ३८२६ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध करुन एका कंपनीला कामाचे कंत्राटही देण्यात आले होते. मात्र, स्मारकाच्या उंची व जागेवरुन वाद निर्माण झाला होता. आता नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर असून विविध प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. तर शिवस्मारकाचा देखील आढावा घेतील, अशी अपेक्षा शिवप्रेमी व्यक्त करत आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम